अकरावी प्रवेशाची शेवटची संधी, आजपासून सुरु होणार आणखी एक विशेष फेरी

अकरावीत अद्याप प्रवेश न मिळालेले व नुकत्याच झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे १९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत एका विशेष फेरीच आयोजन करण्यात आलं आहे. या फेरीत आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, कॉलेजांनी काही कारणांमुळे प्रवेश नाकारलेले विद्यार्थी, एटीकेटी असलेल विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, नव्याने नोंदणी करणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.

प्रक्रिया होणार बंद

दरम्यान या फेरीत आधीचे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी या प्रवेश फेरीत सहभागी होऊ शकणार आहेत. मात्र या नव्या फेरीसाठी कॉलेजांमधील रिक्त जागांची स्थिती ही फार कमी असल्यानं या सर्वांचा विचार करून मगच विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रक्रिया करावी, असं आवाहनही उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे. तसंच ही शेवटची फेरी असून यानंतर ही प्रक्रिया बंद झाल्याचे जाहीर करण्यात येईल, असं आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केलं आहे.

प्रवेश फेरीचं वेळापत्रक

  • १९ ते २२ सप्टेंबर - संध्याकाळी ५ वाजेपर्यंत - विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करणे
  • २२ सप्टेंबर - संध्याकाळी ७ वाजता - कॉलेजांतील रिक्त जागांची यादी जाहीर होणार
  • २४ ते २८ सप्टेंबर - प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीला अर्ज करण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना कॉलेज निवड करण्याची मुभा
  • २४ ते २९ सप्टेंबर - विद्यार्थ्यांनी कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घेणे


हेही वाचा-

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'साठी ८४ हजार जागा उपलब्ध

फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाला सुरूवात


पुढील बातमी
इतर बातम्या