online school: बालवाडी ते १२ वी ‘असा’ होईल अभ्यास, आॅनलाईन वर्गांचं वेळापत्रक जाहीर

ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक ते बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन वर्गांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थी हित व आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (maharashtra education department announced online class schedule)

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करणंं शक्य नसल्याने १५ जून २०२० पासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना देण्यात आले आहेत. 

हेही वाचा - आॅनलाईन अभ्यास घेताना घ्या ‘ही’ काळजी, नाहीतर अकाऊन्ट होईल साफ

या शासन निर्णयात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतच्या अंदाजे तारखा देण्यात आल्या आहेत. तसंच त्यामध्ये आॅनलाईन शिक्षण सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार खालील तक्त्यानुसार पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यावं. 

  • पूर्व प्राथमिक (बालवाडी) - सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग घेण्यात येईल. त्याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असेल. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाईल.

  • पहिली व दुसरी - सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येतील. यामध्ये १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असेल. तर उर्वरित १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाईल.

  • तिसरी ते आठवी -  या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतले जातील. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाईल.

राज्य सरकारने भलेही १५ जून २०२० पासून नव्या शैक्षणिक वर्षाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्याला अद्याप सुरू झालेली नाही. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु कोरोनाचं संकट आटोक्यात येण्याऐवजी ते वाढतच चाललं आहे. राज्यात कोरोनाचे ३ लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. अशा स्थितीत आॅनलाईन शिक्षण हाच एकमेव पर्याय सरकारकडे शिल्लक राहिला आहे. त्यानुसारच हे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यातही आॅनलाईन शिक्षणात बऱ्याच अडचणी आहेत, या अडचणी दूर करणं याला सरकारची प्राथमिकता असली पाहिजे.

हेही वाचा - अखेर शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू, मार्गदर्शक तत्वे लवकरच

पुढील बातमी
इतर बातम्या