ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार एमबीए, एमएमएस प्रवेश प्रक्रिया

एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (mba and mms admission process will start in second week of october says higher education minister uday samant)

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असंही उदय सामंत यांनी सांगितलं. 

हेही वाचा - Mumbai University Exam मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर

दरम्यान राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेऊन संपूर्ण निकालप्रक्रिया ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं आहे. 

त्यानुसार मुंबई विद्यापीठाने नुकताच पदवी परीक्षा घेण्यासंदर्भातील पॅटर्नदेखील जाहीर केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नियमित थिअरी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत, तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून बहुपर्यायी पद्धतीनं होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील. 

हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षा घरूनच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा
पुढील बातमी
इतर बातम्या