Advertisement

अंतिम वर्षाच्या परीक्षा घरूनच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा

अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घरूनच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा
SHARES

अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना घरी बसून देता येणार आहे असं सांगितलं. शुक्रवारी १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू.

१५ ते ३० दरम्यान होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जातील. यासंबंधी कुलगुरु निर्णय घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षादेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर न येता देता यावी यासाठी प्रयत्न असून तसाच अहवाल तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात परीक्षा गेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा अशा पद्धतीच्या सूचना कुलगुरुंना केल्या असून कुलपती या नात्याने राज्यपालांनीही त्याच सूचना केल्या आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.हेही वाचा -

कोरोना झाल्यानं NEET, JEE परीक्षा चुकली? चिंता नको, पुन्हा घेतली जाणार परीक्षा

राज्यातील सर्व CET परीक्षा ऑक्टोबरमध्ये, 'या' तारखेवर होऊ शकते शिक्कामोर्तबRead this story in English or हिंदी
संबंधित विषय