Advertisement

कोरोना झाल्यानं NEET, JEE परीक्षा चुकली? चिंता नको, पुन्हा घेतली जाणार परीक्षा

ज्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला आहे आणि त्यामुळे ते परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही.

कोरोना झाल्यानं NEET, JEE परीक्षा चुकली? चिंता नको, पुन्हा घेतली जाणार परीक्षा
SHARES

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे सध्या देशभरात जेईई-मेन परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला आहे आणि त्यामुळे ते परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. कारण अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं परीक्षा देऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी एनटीए पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांनी ncov19@nta.ac.in या संकेत स्थळावर कोरोना पॉझिटिव्ह असलेला रिपोर्ट आणि अॅडमिट कार्ड हे अपलोड करून मेल करायचा आहे. विद्यार्थ्यांची लवकरच पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील आयआयटी आणि एनआयटी या संस्थांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जॉइंट एंट्रन्स एक्झाम (जेईई मेन्‍स) परीक्षेला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य आहेत. परीक्षा केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.हेही वाचा

राज्यातील सर्व CET परीक्षा ऑक्टोबरमध्ये, 'या' तारखेवर होऊ शकते शिक्कामोर्तब

आरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा