Advertisement

जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी ११ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया

सूचनापत्रानुसार जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया ही ११ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी ११ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया
SHARES

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीनं जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेचे सूचना पत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहिर केलं आहे. या सूचनापत्रानुसार जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया ही ११ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

१६ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. तर अर्जाचे शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ही १७ सप्टेंबर आहे. यंदा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आतापर्यंत दोनवेळा परीक्षा स्थगित करण्यात आली होती.

तर JEE मेन्स आणि NEET परीक्षा घेवू नयेत, पुढे ढकलण्यात याव्यात यावरुनही वाद-विवाद सुरु आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये. तसेच भविष्यातील इतर संधीवर परिणाम होवू नये. असे कारण देत जेईई परीक्षा ही निर्धारित १ ते ६ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन होणार आहे. अधिक माहिती आणि अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थी jee.adv.ac.in या संकेतस्थळावर पाहू शकता.

हेही वाचा : MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

जेईई मेन्स परीक्षेत पात्र ठरलेले अडीचलाख विद्यार्थी हे जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र असणार आहेत. मेन्स परीक्षेचा निकाल हा १० सप्टेंबरपर्यंत जाहिर करण्यात येणार आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षा ही २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठीचे हॉलतिकीट हे २१ सप्टेंबर पासून देण्यात येतील.

तर आर्कीटेक्ट अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्कीटेक्चर अॅप्टीट्यूट टेस्ट द्यावी लागेल. यासाठी ५ ते ६ ऑक्टोंबर दरम्यान नोंदणी करता येईल. परीक्षा ८ ऑक्टोंबर रोजी होणार असून, ११ ऑक्टोंबर रोजी याचे निकाल जाहिर करण्यात येणार आहेत.



हेही वाचा

NEET-JEE परीक्षा नकोच! महाराष्ट्रासह ६ राज्यांची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना द्यावीच लागणार परीक्षा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा