Advertisement

NEET-JEE परीक्षेविरोधात काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन

केंद्रातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरात आंदोलन करण्याचं ठरवलं आहे.

NEET-JEE परीक्षेविरोधात काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन
SHARES

NEET (UG) आणि JEE (Main) परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नुकतीच केली आहे. त्यावरून सध्या केंद्र सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यातच केंद्रातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरात आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. हे आंदोलन शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. (Congress to hold countrywide protests against the holding of JEE and NEET exams)

विरोधकांना विचारात न घेता मोदी सरकारने कोरोनाच्या संकटातही नीट आणि जेईई परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे एकाधिकारशाहीचं प्रतिक आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस आंदोलन करणार आहे. राज्याराज्यातील केंद्र सरकारच्या  कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आॅल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणूगोपाल यांनी दिली. 

जेईई-नीट परीक्षा, जीएसटी, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थिती यासोबतच लॉकडाऊनच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसशासीत राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत ७ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेईई आणि नीट या परीक्षांच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते. 

हेही वाचा- NEET-JEE परीक्षा घेण्यासाठी दबाव, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा दावा

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घाबरायचं की त्यांच्या विरोधात लढायचं हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. नाहीतर आपण रोज भेटून अशाच चर्चा करत राहू. मात्र आपल्याला लढायचं असेल तर ते कोणत्याही किंमतीत केलं पाहिजे, असं रोकठोक मत मांडलं.

नियोजित तारखेप्रमाणे जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन याआधी जाहीर करण्यात आलेल्या तारखांप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांना स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलणं विद्यार्थ्यांच्या हिताचं ठरणार नाही. विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेशपत्र देण्यात येईल. ९९ टक्क्यांहून अधिक परीक्षार्थींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या शहरातचं परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल, असं आश्वासन एनटीएने दिलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा