Advertisement

आरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
SHARES

कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्याने आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया देखील रखडली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदत दिली होती. परंतु प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (school admission under RTE extends)

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ (आरटीई) अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्यात येतात. त्यानुसार यंदा प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज मागवून १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली. राज्यात आरटीईच्या ९,३३१ शाळांमध्ये एकूण १ लाख १५ हजार ४६० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ ५३,६८७ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी-पालकांसह मूळ गावी स्थलांतरित झाल्यामुळे प्रवेशनिश्चितीसाठी ते उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेतल्याची महिती आरटीई समन्वयकांनी दिली. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मात्र, यामुळे प्रवेशासाठी आणखी ताटकळत बसावं लागेल.

शाळांनी दिलेल्या तारखांनुसार शाळेत गर्दी होणार नाही, याची काळजी घेऊन पालकांना विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेता येईल. प्रत्यक्ष शाळेत जाणं शक्य नसल्यास आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारे शाळांना पाठवून तात्पुरते प्रवेश घेण्याची मुभा पालकांना देण्यात आली आहे. ज्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली नाही, त्या पालकांशी संपर्क साधून प्रवेशनिश्चिती करण्यास सांगण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.


हेही वाचा -

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

NEET आणि JEE विद्यार्थ्यांसाठी IIT मुंबईतील विद्यार्थ्यांचा पुढाकार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा