Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

चौथी यादी जाहीर झाल्यानंतरही बहुतेक काॅलेजमधील जागा रिक्तच असल्याने अखेर मुंबई विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेला १० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
SHARES

चौथी यादी जाहीर झाल्यानंतरही बहुतेक काॅलेजमधील जागा रिक्तच असल्याने अखेर मुंबई विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेला १० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने २४ आॅगस्ट रोजी अंडरग्रॅज्युएट डिग्री कोर्ससाठी चौथी मेरीट लिस्ट जाहीर केली होती. (Mumbai University extends admission date to September 10)

बहुसंख्य विद्यार्थ्यांना फी ची रक्कम भरण्यास अडचणी येत असल्याने काॅलेजांना देखील जागा भरण्यास अडचणी येत आहेत. खासकरून मध्यम स्तरीय काॅलेजांना रिक्त जागा भरण्यास संघर्ष करावा लागत आहे. एवढंच नाही, तर पहिली मेरीट लिस्ट जाहीर झाल्यानंतरच ज्या काॅलेजांमधील जागा भरत येतात, अशा काॅलेजात देखील अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. 

यंदा बहुतेक काॅलेजातील कट आॅफ गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्तच राहिले आहेत. त्यातही चौथी मेरीट लिस्ट जाहीर होऊन गेली तरी पहिल्या यादीत नाव येऊनही काॅलेजात प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काॅलेजांनी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी पहिली मेरीट लिस्ट जाहीर केली होती. या यादीतील कट आॅफ देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्तच होते. सर्व विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश मिळावा यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.


हेही वाचा- 

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये, राज्य सरकारने केलं जाहीर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा