Advertisement

Mumbai university exam मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर


Mumbai university exam मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठानं पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नियमित थिअरी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत, तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून बहुपर्यायी पद्धतीनं होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील. 

पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठानं दिला असून संलग्न महाविद्यालयांनी त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत. मुंबई विद्यापीठानं परीक्षांच्या आयोजनासंदर्भात मंगळवारी मध्यरात्री परिपत्रक जारी केलं. क्लस्टर पद्धतीनं महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच एक लीड महाविद्यालय आणि त्याअंतर्गत त्या परिसरातील ६ ते ७ विद्यालय अशी मिळून क्लस्टर्स असतील. 

या एका क्लस्टरमध्ये एका वेळी एका वेळापत्रकानुसार, परीक्षा होतील. प्रश्नपत्रिकाही क्लस्टरनिहाय असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून सूचना मिळतील.

सर्व थेअरी परीक्षा १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. सर्व थेअरी परीक्षा ऑनलाइन होतील. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. 

परीक्षा ५० गुणांसाठी आणि १ तास कालावधीची असेल. ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेअरी परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्याचे गुण तयार करावेत, थेअरी परीक्षेचे मूल्यांकन हे ५० गुणांचे असल्यामुळे संबंधित विषयाच्या कमाल (६०, ७५, ८०, १०० इत्यादी) गुणांनुसार रुपांतर करून दोन दिवसांच्या आत विद्यापीठाच्या ऑनलाइन सिस्टिमध्ये अपलोड करावेत, अशा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.

बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबर २०२० पासून सुरू कराव्यात, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. जर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कॉलेजने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतल्या असतील, तर पुन्हा घेऊ नयेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा