MPSC परीक्षा ठरल्यानुसारच होणार, आयोगाकडून स्पष्टीकरण

राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी म्हणजेच ११ एप्रिलला होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होईल. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. पण आता ही परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी केली आहे. ‘लॉक डाऊन’ असताना रविवारी ११ एप्रिलला होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारनं विचार करावा, ही विनंती. असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं होतं.


हेही वाचा

दहावी-बारावीच्या परीक्षेआधी शिक्षकांना पाहिजे कोरोना लस!

शैक्षणिक कर्ज कुणाकडून घेणं ठरेल फायदेशीर?, जाणून घ्या बँकांचे व्याजदर

पुढील बातमी
इतर बातम्या