Advertisement

शैक्षणिक कर्ज कुणाकडून घेणं ठरेल फायदेशीर?, जाणून घ्या बँकांचे व्याजदर

शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे आहेत. त्यामुळे कर्ज घेताना दरांची तुलना करणं महत्वाचं आहे. कारण त्याचा परिणाम ईएमआयवर होतो.

शैक्षणिक कर्ज कुणाकडून घेणं ठरेल फायदेशीर?, जाणून घ्या बँकांचे व्याजदर
SHARES

वाढती महागाई पाहता उच्च शिक्षणाचा खर्च करणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक कर्ज घेणं हा पालकांकडे एकच पर्याय आहे. भारत आणि परदेशातील काही संस्थांकरिता जवळपास सर्व बँकांकडून शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. शिक्षण कर्ज पालक किंवा विद्यार्थ्यांद्वारे घेतले जाऊ शकते. या कर्जाची परतफेड कोर्स पूर्ण झाल्यावर केली जाऊ शकते.

शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे आहेत. त्यामुळे कर्ज घेताना दरांची तुलना करणं महत्वाचं आहे. कारण त्याचा परिणाम ईएमआयवर होतो. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) आठ वर्षांच्या १० लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी १३,५५९ रुपये ईएमआय येईल, तर एचडीएफसी बँकेचा  ईएमआय १४,९३७ रुपये असेल. 

बँका कशासाठी कर्ज देतात?

- महाविद्यालय / शाळा / वसतिगृहाची फी

- विद्यार्थ्यांचा जीवन विमा प्रीमियम, पुस्तके, उपकरणे, गणवेश,

- परीक्षा, ग्रंथालय, प्रयोगशाळा शुल्क

- अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा इतर कोणताही खर्च - जसे की अभ्यास दौरे, प्रकल्पांचे काम, प्रबंध इ.

- आवश्यक असल्यास संगणक खरेदी


बँक                  व्याजदर (टक्के)

एसबीआय                 ६.८५

एचडीएफसी                ९.५५

बँक ऑफ बडोदा            ६.७५  

युनियन बँक                ६.८० 

सेंट्रल बँक                   ६.८५ 

बँक ऑफ इंडिया             ६.८५

पीएनबी                      ६.९०

आयडीबीआय                 ६.९०

कॅनरा बँक                    ६.९०

इंडियन बँक                   ७.१५ 

अ‍ॅक्सिस बँक                  ९.७०  

आयसीआयसीआय            १०.५०



हेही वाचा -

दिलासादायक! आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली

ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघाला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा