Advertisement

दिलासादायक! आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली

तुम्ही पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक केलं का? नाही केलंत? मग तुमच्यासाठीच एक दिलासादायक बातमी आहे.

दिलासादायक! आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली
SHARES

तुम्ही पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक केलं का? नाही केलंत? मग तुमच्यासाठीच एक  दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारनं पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची मुदत आणखी वाढवली आहे. त्यामुळे आता ३० जून २०२१ पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करता येणार आहे.

यापूर्वी पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ होती. केंद्र सरकारनं बुधवारी आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख, शेवटच्या काही तासांत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवार ३१ मार्च २०२१ पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आजच्या शेवटच्या दिवशी इनकम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट अचानक हँग होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट क्रॅश होत असल्यानं लोक पॅन - आधार लिंक करू शकत नव्हते. अनेकांनी ट्विटरवर याबाबत तक्रार केल्यानंतर पॅन-आधार लिंक करण्याची तारीख अखेर वाढवण्यात आली.

सरकारकडून सध्या तीन महिन्यांची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास समस्या येत असल्यास, मोबाईलवरुन SMS करूनही आधार-पॅन लिंक करता येणार आहे.

UIDPAN टाईप करून १२ अंकी Aadhaar नंबर लिहा आणि त्यानंतर १० अंकी पॅन नंबर लिहा. आता हा एसएमएस ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवा. UIDPAN<आधार क्रमांक><पॅन क्रमांक> अशाप्रकारे एसएमएसद्वारेही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करता येणार आहे.



हेही वाचा

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, 'हे' आहे कारण

१ एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, जाणून घ्या दैनंदिन जीवनावर कसा होईल परिणाम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा