Advertisement

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, 'हे' आहे कारण

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार आहे. विमान प्रवास करणाऱ्यांना आता तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, 'हे' आहे कारण
SHARES

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळ सुरक्षा शुल्कात (ASF) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांना आता तिकिटासाठी जास्त पैसे  मोजावे लागणार आहेत.

देशांतर्गत प्रवाशांसाठी विमानतळ सुरक्षा शुल्कात  ४० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता  विमानतळ सुरक्षा शुल्क म्हणून देशांतर्गत प्रवाशांना २०० रुपये द्यावे लागतील. आधी हे शुल्क १६० रुपये होते. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२ डॉलर विमानतळ सुरक्षा शुल्क द्यावं लागणार आहे. 

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमानतळ सुरक्षा शुल्क द्यावे लागते. मात्र, २ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, ऑन ड्युटी एअरलाइन कर्मचारी किंवा एकाच तिकीटाद्वारे कनेक्टिंग फ्लाइट पकडणाऱ्या प्रवाशांना सवलत मिळते. 

विमानतळ सुरक्षा शुल्काचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. सप्टेंबर २०२० मध्ये हे शुल्क १५० रुपये होते. त्यात १० रुपयांची वाढ करून हे शुल्क १६० रुपये झाले. आता हे शुल्क २०० रुपये झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळ सुरक्षा शुल्क ४.९५ डॉलरवरुन ५.२० डॉलर करण्यात आले होते.आता हे शुल्क १२ डॉलर झालं आहे.



हेही वाचा -

  1. ३१ मार्चपर्यंत करा 'ही' १० महत्वाची कामं, अन्यथा खिशाला पडेल मोठा भुर्दंड

  1. १ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी शुल्क
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा