Advertisement

१ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी शुल्क

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) आता पैसे जमा आणि पैसे काढण्यासाठी शुल्क आकारणार आहे. एईपीएस (आधार आधारित पेमेंट सिस्टम-AEPS) व्यवहारांवरही शुल्क आकारलं जाणार आहे.

१ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी शुल्क
SHARES

जर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) आता पैसे जमा आणि पैसे काढण्यासाठी शुल्क आकारणार आहे. एईपीएस (आधार आधारित पेमेंट सिस्टम-AEPS) व्यवहारांवरही शुल्क आकारलं जाणार आहे. १ एप्रिल २०२१ पासून हे शुल्क आकारलं जाणार आहे. 

मूलभूत बचत खात्यातून (बेसिक सेव्हिंग अकाउंट्स) दरमहा ४ वेळा पैसे काढणे विनामूल्य आहे. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर आता किमान २५ रुपये किंवा काढलेल्या रकमेच्या मूल्याच्या ०.५० टक्के शुल्क आकारलं जाणार आहे. 

 जर पोस्ट ऑफिसमध्ये मूलभूत बचत खाते किंवा चालू खाते असेल तर एका महिन्यात २५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढणे विनामूल्य आहे. त्यानंतर अधिक रक्कम काढल्यास प्रत्येक व्यवहारावर ०.५० टक्के किंवा किमान २५ रुपये शुल्क द्यावं लागणार आहे.  अशा खात्यात पैसे जमा करण्यासही मर्यादा आहे. या खात्यात दरमहा १० हजारापर्यंत जमा करता येतात. त्याहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर ०.५० टक्के शुल्क किंवा किमान २५ रुपये द्यावे लागतील.

एईपीएस व्यवहारासाठी शुल्क 

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या नेटवर्कवर आधार आधारित एईपीएस व्यवहार पूर्णपणे विनामूल्य आहेत. आयपीपीबी नसलेल्या नेटवर्कवर महिन्यात तीन व्यवहार विनामूल्य असतात. यात रोख रक्कम जमा करणे, पैसै काढणे, मिनी स्टेटमेन्ट काढणे यांचा समावेश आहे. विनामूल्यनंतरच्या व्यवहारावर शुल्क आकारले जाईल. विनामूल्य मर्यादा पूर्ण झाल्यानंतर पैसे जमा करण्याच्या सर्व व्यवहारांवर २० रुपये आकारले जातील. पैसे काढतानाही २० रुपये शुल्क द्यावं लागणार आहे.

जीएसटीही द्यावा लागेल

पोस्ट ऑफिस मिनी स्टेटमेंट काढण्यासाठीचं शुल्क ५ रुपये आहे. विनामूल्य व्यवहारानंतर पैसे पाठवण्यासाठी १ टक्के शुल्क पाठवलेल्या रकमेवर आकारलं जाईल. या व्यवहारासाठी जास्तीत जास्त शुल्क २० रुपये तर किमान १ रुपये असेल.  

किमान शिल्लक न ठेवल्यास शुल्क 

आयपीपीबीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक केलं होतं. बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक ५०० रुपयांपेक्षा कमी असेल तर १०० रुपये शुल्क आकारलं जाईल. जर खात्यात कधीही ५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे नसतील तर आर्थिक वर्षाच्या शेवटी खाते देखभाल म्हणून १०० रुपये आकारले जातील. जर आपल्या खात्यात फक्त ५०० रुपये असतील तर आपण त्यातून एक रुपयाही काढू शकणार नाही.

बचत खात्यावर ४ टक्के व्याज

पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वार्षिक ४ टक्के व्याज मिळते. १० हजार रुपयांपर्यंतचे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे.  बचत खात्यावर एटीएम कार्ड, फंड ट्रान्सफर, बिल पेमेंट, रिचार्ज, नेट बँकिंग यासारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. हेही वाचा - 

  1. ३१ मार्चपर्यंत करा 'ही' १० महत्वाची कामं, अन्यथा खिशाला पडेल मोठा भुर्दंड

१ एप्रिलपासून प्राप्तिकर संबंधित ५ नियमात बदल, त्याचा परिणाम तुमच्या खिशावरही होणार

तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी भरा आयटीआर, मिळतील 'हे' फायदे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा