Advertisement

ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघाला

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. पीपीएफवरील व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला होता.

ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघाला
SHARES

पीपीएफसह सगळ्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये १ एप्रिलपासून कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाला असल्याचं सांगितलं आहे. व्याजदरात कसलाही बदल केला गेला नसल्याचं निर्मला सीतारमन यांनी ट्विट करून म्हटलं आहे. त्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला होता. पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याजदर वार्षिक ४ वरून ३.५ टक्के तर एक वर्षांच्या मुदतठेवींवरील व्याजदर ५.५ वरून ४.४ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांंवरील व्याजदर ७.४ वरून ६.५ टक्के करण्यात आला होता. 

तसंच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ वरून ५.९ टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के केला होता.  सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला होता. 

मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याने ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.चुकून याबाबत आदेश निघाला असून व्याजदरात जैसे थे असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केलं आहे. 



हेही वाचा -

  1. दिलासादायक! आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली

  1. १ एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, जाणून घ्या दैनंदिन जीवनावर कसा होईल परिणाम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा