Advertisement

दहावी-बारावीच्या परीक्षेआधी शिक्षकांना पाहिजे कोरोना लस!

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा लवकरच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षेआधी शिक्षकांना पाहिजे कोरोना लस!
File Image
SHARES

वृत्तानुसार, महाराष्ट्रातील शिक्षकांनी प्राधान्यानं त्यांना COVID 19 ची लस द्यावी, अशी विनंती राज्य शिक्षण विभागाला केली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा लवकरच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. शिवाय, कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांना व्हायरस-मुक्त असणं अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान, बोर्डाच्या परीक्षा घेण्याबाबत जाहीर करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) नुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना राज्यात बोर्ड परीक्षा घेण्यापूर्वी लस द्यावी लागेल. तसंच परीक्षेच्या कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचार्‍यांना परीक्षेच्या ४८ तास आधी नकारात्मक आरटी-पीसीआर अहवाल मिळाला पाहिजे.

दुसरीकडे, कोरोनव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवार, ६ एप्रिल रोजी बैठक आयोजित केली आहे.

यापूर्वी गायकवाड यांनी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याची माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली होती. तथापि, ब्रेकचेन मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं नवीन कडक निर्बंध लादत असताना, ऑनलाइन परीक्षाच घ्यावी अशी विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे.

COVID 19 रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, नागरिकांना सतर्क राहून आवश्यकतेनुसारच घरातून बाहेर पडण्यास सांगितलं आहे. मास्क घालणं आणि सामाजिक अंतर राखणं नेहमीच बंधनकारक केलं गेलं आहे. पण नागरिक याकडे कानाडोळा करतात. अशांकडून अधिकारी दंड आकारतली.



हेही वाचा

बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून मिळणार हॉल तिकिट

कोरोनामुळे १० वी, १२ वी परीक्षा देऊ न शकणाऱ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा