Advertisement

बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून मिळणार हॉल तिकिट

राज्य मंडळाने गुरुवारी निवेदन प्रसिद्ध केले असून संबंधित शाळा, विद्यालये यांनी कोणतेही शुल्क न आकारता हॉल तिकिटाची प्रिंट द्यायची आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून मिळणार हॉल तिकिट
SHARES

बारावीच्या परीक्षेचं हॉल तिकिट शनिवारपासून उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं राज्य मंडळाने जाहीर केलं आहे. राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ३ एप्रिलपासून हॉल तिकिट महाविद्यालयांना उपलब्ध होणार आहेत.

उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना बारावी परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ३ एप्रिलपासून उपलब्ध करून दिले जाणार आहे. संकेतस्थळावरील कॉलेज लॉगिनमधून हे प्रवेशपत्र महाविद्यालयांना डाऊनलोड करता येणार आहे.

 राज्य मंडळाने गुरुवारी निवेदन प्रसिद्ध केले असून संबंधित शाळा, विद्यालये यांनी कोणतेही शुल्क न आकारता हॉल तिकिटाची प्रिंट द्यायची आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

हॉल तिकिटबाबत मंडळाच्या सूचना

- सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन हॉल तिकिट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत

- प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारु नये

- प्रिंटवर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी

- हॉल तिकिटमध्ये विषय, माध्यम बदल असेल तर दुरूस्तीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जावे

- फोटो, सही, नाव यासंदर्भात दुरूस्ती असल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावी

- हॉल तिकिट गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने Duplicate असा शेरा द्यावा

- फोटो खराब असल्यास नवीन फोटो लावून संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी



हेही वाचा -

  1. मालमत्ता कर थकवणाऱ्यांना दणका, सांडपाणी वाहून नेण्याचा मार्ग बंद

  1. अखेर 'सनराईज' रुग्णालयाला लागलं टाळं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा