MPSC पूर्व परीक्षाही पुढे ढकलल्या

कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा २६ एप्रिल व १० मे रोजी होणार होत्या. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आयोगाने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, २६ एप्रिल २०२० रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आणि १० मे २०२० रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट- ब) संयुक्त पूर्व परीक्षा २०२० होणार होती. या दोन्ही परीक्षा आता लॉकडाऊन स्थिती आणि एकूणच करोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे पुढे ढकलण्यात येत आहेत. 

दोन्ही परीक्षांच्या नवीन तारखा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहेत. परीक्षेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ५ एप्रिल रोजी होणार असलेली राज्यसेवा आयोगाची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. 


हेही वाचा -

2 महिन्यांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' घट

लॉकडाऊनमुळं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, काॅल करा 'ह्या' क्रमांकावर


पुढील बातमी
इतर बातम्या