Advertisement

2 महिन्यांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' घट

भारतातील सर्वांधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना कोरोना व्हायरसचा मोठा फटकाबसला आहे.

2 महिन्यांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' घट
SHARES

भारतातील सर्वांधिक श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना कोरोना व्हायरसचा मोठा फटकाबसला आहे. अंबानी यांच्या संपत्तीत मागील 2 महिन्यात २८ टक्क्यांची घट झाली आहे. हुरुन ग्लोबलने तयार केलेल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये ही माहिती समोर आली आहे.  अंबानी यांची संपत्ती दररोज ३०० मिलियन डॉलरने (३० कोटी) कमी होऊन ३१ मार्चला ४८ बिलियन डॉलर पर्यंत आली आहे. त्यांच्या संपत्तीत तब्बल १ लाख ४४ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. अंबानी यांच्याशिवाय गौतम अदानी, शिव नाडर आणि उदय कोटक यांच्या संपत्तीतही घट नोंदवण्यात आली आहे. 

अंबांनी यांची एकूण संपत्ती आता ३ लाख ६५ हजार कोटी रुपयांवर आली आहे.  शेअर बाजारातील मोठी घसरण हे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट येण्याचं मोठं कारण आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलायन्सच्या समभागाची किंमत १,४५७ रु. होती. मात्र, शेअर बाजारातील घसरणीत मार्चच्या अखेरच्या आठवड्यात याची किंमत ४०% पर्यंत घटून ८७५ रुपयांवर आली होती. हा ५२ आठवड्यांतील सर्वात नीचांकी स्तर आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टच्या मते, मुकेश अंंबानी यांची संपत्ती फेब्रुवारी-मार्च या कालावधीत १९ अब्ज डॉलर कमी झाली आहे.  यामुळे ते जगभरातील श्रीमंतांच्या यादीत आठव्या स्थानावरुन १७ व्या स्थानी आले आहेत. 

अदानी यांच्याही संपत्तीत ६ अब्ज डॉलर (३७ टक्के) ची घट झाली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर यांची संपत्ती ५ अब्ज डॉलर (२६ टक्के) आणि बँकर उदय कोटक यांच्या संपत्तीत ४ अब्ज डॉलरची (२८ टक्के) घसरण झाली आहे. या नव्या यादीतून भारतातील तीन उद्योगपती जगातील १०० श्रीमंत व्यक्तींच्या सूचीतून बाहेर पडली आहेत. यात आता फक्त एकटे अंबानी हेच उरले आहेत. दुसरीकडे, चीनच्या सहा उद्योगपतींना या यादीत स्थान मिळाले आहे.

जगातील अव्वल १० श्रीमंतांत समाविष्ट कार्लाेस स्लिम आणि फॅमिली, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, लॅरी पेज, सर्गेई ब्रिन आणि मायकेल ब्लुमबर्ग यांच्या संपत्तीत घट आली. अॅमेझाॅनचे जेफ बेजाेस १३,१०० काेटी डाॅलर (९.८२ लाख काेटी रुपये) संपत्तीसह सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

भारतीय शेअर बाजारांत गेल्या दाेन महिन्यांदरम्यान २६% घसरण झाली आहे. तर दुसरीकडे डाॅलरच्या तुलनेत रुपया ५.२ टक्के कमकुवत झाला. त्यामुळे या श्रीमंतांच्या संपत्तीत ही घट पहायला मिळाली आहे.




हेही वाचा -

लॉकडाऊनमुळं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, काॅल करा 'ह्या' क्रमांकावर

हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक, मात्र ग्राहक नाही

कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची सुखरूप सुटका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा