Advertisement

कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची सुखरूप सुटका

कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची स्वयंसेवी संस्था, वनविभाग, मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे.

कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची सुखरूप सुटका
SHARES

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यास संबंधित व्यक्ती इतरांच्या संपर्कात येऊन नये यासाठी त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात येतं. त्यानुसार, एका व्यक्तीला करोनाची लागण झाली असून, त्या कोरोनाबाधिताचे घर ताब्यात घेऊन घरातील सर्व व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेण्यात आलं. मात्र, त्यावेळी घरात माणसांसोबत एक पोपटही राहत होता. त्यामुळं त्या घरात एकटाच अडकलेल्या पोपटाची स्वयंसेवी संस्था, वनविभाग, मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे.

भांडुप येथील एका घरात करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर महापालिकेतर्फे १ एप्रिलपासून ताब्यात घेण्यात आला होता. या घरातील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असून संबंधित घरातील सर्व व्यक्तींना अलगीकरण कक्षात नेण्यात आलं, परंतु, त्या घरात एक पाळलेला पोपट १ एप्रिलपासून पिंजऱ्यातच अन्नपाण्याविना होता. पोपट ३ दिवसांपासूनच घरात असल्याची माहिती प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीला मिळाल्यानंतर त्यांनी संस्थेच्यावतीनं मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, वनविभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या पोपटाची तातडीनं सुटका करण्याबाबत विनंती केली. 

त्यानुसार, महापालिका, पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी भांडुप येथील त्या वस्तीत गेले. सर्वप्रथम घराचा परिसर र्निजतुक करून, आरोग्यविषयक सर्व सुरक्षा साहित्याचा वापर करत मग संबंधित घराचे कुलुप तोडण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोपटाचा पिंजरादेखील र्निजतुक करून पोपटाची त्या घरातून सुटका करण्यात आली. त्यानंतर या पोपटाची रवानगी परळ येथील पशुरुग्णालयात करण्यात आली असून, पोपटाची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती कुंजू यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इमारत, परिसर ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्या घरातील पाळीव प्राणी एकटे पडू शकतात. त्यावेळी त्यांच्या अन्नपाण्याबाबत अडचणीची परिस्थिती होऊ शकते. मुंबईत अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्यानं असा प्रसंग उद्भवलाच तर ‘प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर’ संघटनेच्या ९८३३४ ८०३८८ या मदत क्रमांकावर संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 


हेही वाचा -

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६८ वर

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता- अनिल परब



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा