Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता- अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता- अनिल परब
SHARES

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. देशात लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सेवा देत आहेत. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबर एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र  सेवा करीत आहेत. त्यामुळं आता त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब यांनी केली. 

'२३ मार्चपासून पुढील ३ आठवडे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व व्यवहार बंद झाले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनानं एसटी महामंडळावर टाकली आहे. त्यानुसार, मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या बसेद्वारे दररोज अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत', असं अनिल परब यांनी म्हटलं.  

'दररोज एसटी कर्मचारी चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून, अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ मुंबईतीलच नव्हे तर ठाणे,पालघर रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचं मुंबईत घर नाही, त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळमार्फत करण्यात आली आहे. तसंच, सगळ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यवर जात असताना मास्क व सॅनेटरी लिक्विडची बाटली देण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी एसटी प्रशासना मार्फत घेण्यात येत आहे', असंही अनिल परब यांनी म्हटलं. 



हेही वाचा -

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६८ वर

लॉकडाऊनमध्ये ट्रॉलर भाड्याने देणे महागात पडणार, मच्छीमारांना



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा