लॉकडाऊनमध्ये ट्रॉलर भाड्याने देणे महागात पडणार, मच्छीमारांना


लॉकडाऊनमध्ये ट्रॉलर भाड्याने देणे महागात पडणार, मच्छीमारांना
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ट्रॉलर भाड्याने देणा-या मच्छीमारांवर कारवाई करण्याचे आदेश सागरी पोलिसांनी दिले आहेत. गुजरातमधील बोटी मुंबईच्या दिशेने येण्याची शक्यता असून त्यांना किना-यावर उतरू न देण्याच्या सूचनाही पोलिसांनी मुंबईतील मच्छीमारांना केल्या आहेत. त्यासाठी पोलिसही सतर्क झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोकण किनारपट्टीच्या लगत असलेल्या समुद्र किना-यांवर गुजरात, सौराष्ट्र येथील खलाश्यांच्या बोटी दिसून आल्या आहेत. 


अनेक ठिकाणी या बोटी किना-यावर लागवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांना विरोध झाला. त्यामुळे या सर्व बोटी आता मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर मुंबईत सागरी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सागरी पोलिसांनीही मुंबईतील स्थानिक मच्छीमारांना परराज्यातील बोटी परिसरत उतरवू न देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातील काही खलाशी कोरोनाग्रस्त अल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्या अनुषंगाने या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवय आपल्या बंदरात कोणत्याही अनोळखी बोटींना प्रवेश न देण्याच्या सूचना पोलसांनी सर्व मच्छीमारांना दिले आहेत. 

तसेच अनेक मच्छीमार आपल्या बोटी भाडे तत्त्तवावर इतरांना वापरण्यासाठी देतात. कोरनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनचे आदेश आहेत. त्यानंतरही कोणी आपल्या ट्रॉलर इतर व्यक्तीला भाड्याने दिल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही सागरी पोलिसांनी मच्छीमारांना केल्या आहेत. अशा बोटी आपल्या परिसरात सापडल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही पोलिासंकडून करण्यात आले आहे
संबंधित विषय