Advertisement

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६८ वर

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना यामध्ये आणखी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६८ वर
SHARES

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना यामध्ये आणखी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यात आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ८६८ झाली आहे. त्याशिवाय, ७० करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. तसंच, ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

सध्या राज्यभरात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर महापालिका क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. 

सर्वेक्षण पथकं

  • कल्याण महापालिका क्षेत्रात १७५ सर्वेक्षण पथकं काम करत आहेत. 
  • ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २१४ टीम कार्यरत आहेत. 
  • नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १७८ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. 
  • अहमदनगर जिल्ह्यात ७१ सर्वेक्षण पथके काम करत आहेत. 
  • बुलढाणा जिल्ह्यात १४७ सर्वेक्षण पथके काम करत आहेत. 
  • राज्यात या प्रकारे एकूण २८५५ सर्वेक्षण पथके काम करत आहेत.
  • आतपर्यंत त्यांनी १० लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेले रुग्ण

  • मुंबई - ५२६ (मृत्यू ३४)
  • पुणे (शहर व ग्रामीण भाग) १४१ (मृत्यू ०५)
  • सांगली - २५
  • ठाणे मंडळातील मनपा - ८५ (मृत्यू ०९)
  • नागपूर - १७
  • अहमदनगर- २३
  • यवतमाळ - ४
  • उस्मानाबाद- ३
  • लातूर - ८
  • औरंगाबाद- १० ( मृत्यू ०१)
  • बुलढाणा- ५ ( मृत्यू ०१)
  • सातारा - ५
  • जळगाव- २ ( मृत्यू ०१)
  • कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक प्रत्येकी - २
  • सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशीम, अमरावती - (मृत्यू १),
  • हिंगोली, जालना - प्रत्येकी १
  • इतर राज्य - २
  • एकूण- ८६८ त्यापैकी ७० जणांना घरी सोडले. तर ५२ जणांचा मृत्यू



हेही वाचा - 

मोदी सरकारचा धाडसी निर्णय, खासदारांची वर्षभरासाठी ‘इतकी’ वेतन कपात

आता तरी लपू नका, समोर या, अजित पवार यांनी कुणाला दिला इशारा?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा