Advertisement

यंदा प्रथमच हापूस आंब्याच्या खरेदीला ग्राहक नाही

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सोमवारी कोकणातून हापूसच्या ४५ हजार पेट्यांची आवक झाली आहे.

यंदा प्रथमच हापूस आंब्याच्या खरेदीला ग्राहक नाही
SHARES

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की सर्वांच्या नजरा आंब्यावर जातात. कोकणातील हापूस आंबा दरवर्षी मोठ्या संख्येनं विकला जातो. यंदाही बाजारात हा हापूल विक्रीसाठी आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सोमवारी कोकणातून हापूसच्या ४५ हजार पेट्यांची आवक झाली आहे. परंतु कोरोनामुळं ग्राहक नसल्यानं योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे.

गतवर्षी ५ ते ८ डझनची पेटी २ ते ५ हजार रुपयांना विकली जात होती. यंदा मात्र ८०० ते २ हजार रुपयांना विकावी लागत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका कोकणातील आंबा उत्पादकांना बसला आहे. पावसाळा वाढल्यामुळं आंब्याला उशीरा मोहर आला. मार्केटमध्ये आंबा येण्यास सुरवात झाली असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं देशभर लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे निर्यात बंद झाली व देशांतर्गत मार्केटवरील विक्रीवरही परिणाम झाला आहे. 

झाडावरच आंबा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळं शासनानं आंबा हंगाम सुरळीत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून निर्यातीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी मुंबईमध्ये विशेष कक्ष तयार केला आहे. यामुळं शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. सोमवारी मुंबई बाजारसमितीमध्ये ४५ हजार पेट्यांची आवक झाली आहे. परंतु मुंबई व नवी मुंबईमधील अनेक फळ विक्रेत्यांची दुकानं बंद आहे. हजारो नागरिक गावी गेले आहेत.



हेही वाचा -

कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची सुखरूप सुटका

अन्नधान्यासाठी महापालिकेच्या हेल्पलाइनवर मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा