Advertisement

अन्नधान्यासाठी महापालिकेच्या हेल्पलाइनवर मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारसह महापालिका विविध उपाययोजना करत आहे. त

अन्नधान्यासाठी महापालिकेच्या हेल्पलाइनवर मागणी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारसह महापालिका विविध उपाययोजना करत आहे. तसंच, नागरिकांना या कालावधीत मदत मिळावी यासाठी महापालिकेनं हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर आता धान्याच्या पुरवठ्यासाठी अनेक नागरिकांनी संपर्क साधला आहे. तसंच, अन्नपदार्थाची तयार पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. टाळेबंदी आणि संचारबंदीमुळं जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद आहेत. मात्र किराणा मालाच्या दुकानांमधील काही जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. 

काही सामाजिक संस्थांच्या मदतीनं धान्य आणि अन्नपदार्थाच्या पाकिटांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात येत आहे. खासगी दवाखाने बंद आहेत. मुंबईकरांना आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी महापालिकेनं ३० मार्च रोजी १८००२२१२९२ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केला आहे. या हेल्पलाइनवर रविवार ५ एप्रिलपर्यंत २६२५ जणांनी संपर्क साधला होता. यापैकी १४८४ जणांनी अन्नधान्याचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. 

९८९ जणांनी अन्नपदार्थाची पाकिटं मिळावी यासाठी पालिकेशी संपर्क साधला होता. अन्य ठिकाणी जाण्यासाठी ७ जणांनी वाहतूक व्यवस्थेची, तर निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी ७ जणांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधला आहे. या हेल्पलाइनवर शहर भाागातील ४२.२१ टक्के, पश्चिम उपनगरातील ३६.६९ टक्के, तर पूर्व उपनगरातील १६.९५ टक्के नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला होता. 

महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या हद्दीतून सर्वाधिक म्हणजे ३९७ जणांनी मदतीसाठी या हेल्पलाइनवर संपर्क साधला होता. त्याचप्रमाणं, जी-उत्तरमधील ३१८, एफ-उत्तरमधील २१९, एच-पूर्वमधील २१७, पी-दक्षिणमधील १६२ नागरिकांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधला आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने या सर्वांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम पालिका युद्धपातळीवर करीत आहे.



हेही वाचा -

परळच्या बेस्ट वसाहतीत दोघांना कोरोनाची लागण

अनावश्यक फिरणाऱ्यांची 5570 वाहनं केली पोलिसांनी जप्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा