Advertisement

परळच्या बेस्ट वसाहतीत दोघांना कोरोनाची लागण

मुंबईतील परळ येथील बेस्ट वसाहतीत २ कोरोनाबाधित रग्ण आढळले आहेत.

परळच्या बेस्ट वसाहतीत दोघांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईतील परळ येथील बेस्ट वसाहतीत २ कोरोनाबाधित रग्ण आढळले आहेत. बेस्ट वसाहतीतील २ महिलांना कोरोनाची लागण झाली असून, त्या एकाच कुटुंबातील मायलेकी आहेत. संबंधित विवाहिता आपल्या मुलीसह माहेरी आली होती. या महिलेच्या पतीस यापूर्वी करोनाची लागण झाली होती. तसंच, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

कोरोनाची लागण झालेले हे तिन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामधील पती व पत्नी हे दोन्ही बेस्टचे कर्मचारी नसल्याचंही स्पष्ट झालं आहेत. कोरोना रुग्ण आढळल्याचं स्पष्ट होताच महापालिकेनं तातडीनं ही इमारत सील केली असून, तिथं निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही विवाहिता गणेशगल्ली इथं आपल्या पतीसह राहते. तिचा पती मुंबई विमानतळावर नोकरी करतो. २ दिवसांपूर्वी त्याला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या पालकांसह पत्नी, मुलीची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत पत्नी आणि छोट्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच ही महिला परळमधील बेस्ट वसाहतीत माहेरी आल्याची माहिती मिळते. 

कोरोनाबाधित महिलेचे वडील बेस्टमध्ये कार्यरत आहेत. सध्यस्थितीत या महिलेच्या पतीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्या दोघींना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पालिकेने पुढील संसर्ग रोखण्यासाठी या दोन्ही कुटुंबांच्या संपर्कात कोण कोण आले याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.



हेही वाचा -

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६८ वर

Exclusive : 150 तबलिगीवर मुंबईत पहिला गुन्हा दाखल, माहिती लपवल्याचा आरोप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा