अनावश्यक फिरणाऱ्यांची 5570 वाहनं केली पोलिसांनी जप्त


अनावश्यक फिरणाऱ्यांची  5570 वाहनं केली पोलिसांनी जप्त
SHARES

राज्याच्या विविध जिल्ह्यात वारंवार आवाहन करूनही अनेकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे. अशांना सुरूवातीला पोलिसांनी काठीने प्रसाद दिला. माञ तरी ही रस्त्यावर उतरणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे गृहमंञी अनिल देशमुखांनी अशा बेशिस्तांची वाहने जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुास केलेल्या कारवाईत अवघ्या तीन दिवसात 5570 वाहने राज्यभरात जप्त करण्यात आल्याची माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिली.


करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कलम १४४ लागू केला आहे. याबाबत पोलिसांनी घरामध्ये राहा, 'विनाकारण बाहेर पडू नका' असे एकनाअनेक प्रकारांद्वारे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. पण या नियमाला काही निष्काळजी नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे. संचारबंदीमुळेया काळात सुरुवातीला अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या व्यतिरिक्‍त सोडून अन्य नागरिकांसाठी वाहतूक बंद केली. रस्त्यावर वाहने घेऊन कोणी फिरू नये, यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंधने घातली. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना काठीचाही 'प्रसाद' दिला. पण नागरिकांवर याचाही परिणाम झालाच नाही. देशात लॉकडाऊन जाहीर होऊनही राज्यात बेशिस्तांकडून नियमांचे उल्लंघन होत असून, क्षुल्लक कारणे देत नागरिक रस्त्यांवर वावरत असल्याचे चित्र आहे.

यामुळे रविवारी गृहमंञ्यांनी अशा बेशिस्त आणि अनावश्यक गाडी घेऊन फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरूवात करताच, पोलिसांनी राज्यभरातून तब्बल 5570 वाहने जप्त केली आहे. तर 1410 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या बेशिस्तांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून राज्याच्या तिजोरीत 65 लाख 43 हजार624 रुपये जमा झाल्याचे गृहमंञ्यांनी सांगितले. याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वाहनमालकांवर कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा