Advertisement

लॉकडाऊनमुळं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, काॅल करा 'या' क्रमांकावर

नागरिकांचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं मोफत समुपदेशन हेल्पलाइन सुरू केली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत हेल्पलाइनवर संपर्क साधता येणार आहे.

लॉकडाऊनमुळं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, काॅल करा 'या' क्रमांकावर
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांनाच घरात बसून रहावं लागत आहे. सुरूवातीचे काही दिवस याचे परिणाम जाणवले नाहीत. मात्र, आता काही जणांमुळे भीती वाटणे, सतत मूड बदलणे, चिडचीड, ताण-तणाव वाढल्याचं समोर येत आहे. त्यामुळे या परिस्थितीत नागरिकांचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं मोफत समुपदेशन हेल्पलाइन सुरू केली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत हेल्पलाइनवर संपर्क साधता येणार आहे.

लाॅकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी वगळता लोकांना घरात बसून राहावं लागत आहे. जीवनशैलीत अचानक झालेला हा बदल अनेकांना त्रासदायक ठरत आहे. या बदलाशी जुळवून घेणं अनेकांना कठीण जात आहे. एकाच वेळी सर्व घरात असल्यानं अनेक घरांमध्ये वाद होत असल्याच्यंही संमोर येत आहेत. चिडचीड वाढून ताण-तणाव वाढले आहेत. कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. तर, दुसरीकडं लॉकडाऊन कधी संपणार याबद्दलची संभ्रमावस्था आहे. यामुळं एक अदृश्य ताण-तणाव जाणवतो आहे. हळव्या मनाच्या लोकांना मानसिक त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. अशा मानसिक आजारांना सामोरं जाणाऱ्या नागरिकांना आधार देण्यासाठी राज्य महिला आयोगाने ही १८००१२१०९८० या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. 

पोद्दार फाउंडेशनच्या मदतीनं ही हेल्पलाइन सुरू केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषांमधे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १८००१२१०९८० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. ही सुविधा मोफत आङे. स्त्री पुरुष कुणीही संपर्क करू शकतात. प्रशिक्षित समुपदेशक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करतील. 



हेही वाचा -

हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक, मात्र ग्राहक नाही

कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची सुखरूप सुटका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा