मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर

अखेर मुंबई विद्यापीठाला 477 असे सर्व निकाल लावण्यात यश आले आहे. गेल्या आठवड्यात 8 महत्त्वाचे निकाल लागणे बाकी होते. मात्र मंगळवारपर्यंत सर्व निकाल विद्यापीठाने लावले आहेत. अखेर निकाल लागल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

31 ऑगस्टनंतर विद्यापीठाने अनेक डेडलाईन दिल्या. मात्र एकही डेडलाईन पाळण्यात विद्यापीठाला यश आले नाही. ऑनलाईन असेसमेंटच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी बसला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. यावेळी 19 सप्टेंबरपर्यंत निकाल लाऊ, असे आश्वासन विद्यापीठाने न्यायालयाला दिले होते. विद्यापीठाने मंगळवारी सगळे निकाल रात्री उशिरा जाहीर केले.

पुनर्मूल्यांकनाचे मोठे आव्हान

सर्व निकाल जाहीर झाले असले तरी पुनर्मूल्यांकनाचे मोठे आव्हान विद्यापीठाकडे आहे. विद्यापीठात पुनर्मूल्यांकनासाठी एकूण 50 हजार अर्ज आले आहेत. छायांकित प्रतिसाठी एकूण 6 हजार अर्ज आले आहेत.

हरवलेल्या उत्तरपत्रिकांचा शोध सुरूच

2 हजार 600 उत्तरपत्रिका या सापडत नव्हत्या. त्यापैकी 900 उत्तरपत्रिकांचा शोध लागला आहे. उर्वरित 1700 उत्तरपत्रिकांचा अद्याप शोध सुरू आहे.


हेही वाचा - 

निकालांसाठी मुंबई विद्यापीठाची पुन्हा डेडलाईन!


पुढील बातमी
इतर बातम्या