Advertisement

निकालांसाठी मुंबई विद्यापीठाची पुन्हा डेडलाईन!


निकालांसाठी मुंबई विद्यापीठाची पुन्हा डेडलाईन!
SHARES

परीक्षांचे निकाल घोषित करण्यास झालेल्या प्रचंड विलंबावर विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई विद्यापीठाने ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत परीक्षांचे निकाल घोषित करण्याचे सांगत पुन्हा नवी डेडलाईन दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. ए. व्ही. मोहता आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत मुंबई विद्यापीठाने ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत मुंबई विद्यापीठाचे निकाल घोषित करण्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे वकील रुई रॉड्रिग्स यांनी दिली. यात विधी, विज्ञान आणि कला शाखेच्या परीक्षांचा समावेश आहे.


निकालाच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणे गरजेचे आहे. निकाल रखडण्यासाठी जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पेपर तपासणीची ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीची होती.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या


माहिती अधिकाराअंतर्गत मे २०१७ रोजी रखडलेल्या मागील निकालाची माहिती काढण्यात आली होती. त्याची माहिती राज्यपाल तसेच शिक्षण मंत्र्यांना पत्रव्यवहार करुन देण्यात आली. तरीही यासंदर्भात म्हणावी तशी काळजी घेण्यात आली नाही. परीक्षा नियंत्रकाचे पद रिक्त असल्याची तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच परिस्थिती आटोक्याबाहेर गेली.
- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते



हे देखील वाचा -

नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा