Advertisement

नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे


नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे
SHARES

एक दोनदा नव्हे, तर डेडलाईनवरून तीनदा तोंडघशी पडल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्यास नवी डेडलाईन देण्यास नकार देत शक्य तितक्या लवकर निकाल लावण्याचे आश्वासन दिले. डेडलाईनपेक्षा निकाल महत्त्वाचे असे वक्तव्य तावडे यांनी केल्याने तावडे यांचा विद्यापीठाच्या कारभारावर भरवसा उरलेला नाही, हेच स्पष्ट होत असल्याचे दिसले.

मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री तावडे यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. मुंबई विद्यापीठ उर्वरीत निकाल
शक्य तितक्या लवकर लागावेत यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर रखडलेल्या निकालांसाठी दोषींवर निकालानंतर कारवाई केली जाईल, असेही तावडे म्हणाले.

मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत त्यांना निकालाबाबतची माहिती दिली.


बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • कॅट (CAT) परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना निकालाची आवश्यकता नाही. मेरीटनुसार अॅडमिशनला परवानगी.
  • ज्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत, त्यांचे निकाल घोषित करण्यात यावे, यावर परीक्षा मंडळाने निर्णय घ्यावा.
  • पुनर्मूल्यांकनासाठी लवकरात लवरत पर्यायी व्यवस्था सुरू करावी, यामुळे पुनर्मूल्यांकन लवकर पूर्ण होईल.


शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठाच्या कारभारावर तोंडसुख घेतले. ३ महिने झाले तरी निकाल का लागले नाहीत? हा गोंधळ का झाला? कोणी केला? ऑनलाईन सिस्टीम बंद करा. ऑनलाईन अॅडमिशन होत नसेल तर ही सक्ती का? सप्टेंबरपर्यत हे निकाल लागण्याची शक्यता नाही. 

विनोद तावडे यांचा राजीनामा घ्यावा, विद्यापीठावर त्यांचा अधिकार नाही. विद्यापीठावर आयएस किंवा आयपीएस दर्जाचा प्रशासक नियुक्त करा. न्यायालयाकडून या सर्व प्रकरणाची पारदर्शक चौकशी करा, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.



हे देखील वाचा -

आदित्य ठाकरे म्हणतात, 'तावडे आणि कुलगुरुंनी राजीनामा द्यावा'!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा