Advertisement

मुंबई विद्यापीठावर आता पुनर्मूल्यांकनाचा भार, ५० हजार अर्ज


मुंबई विद्यापीठावर आता पुनर्मूल्यांकनाचा भार, ५० हजार अर्ज
SHARES

मुंबई विद्यापीठाला निकालांचा गोंधळ डोईजड झालेला असतानाच त्यात विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी दाखल केलेल्या अर्जांची भर पडली आहे. विद्यापीठाच्या आॅनलाईन पेपर तपासणीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनी आता पुनर्मूल्यांकनासाठी धाव घेतली असून विद्यापीठ्याकडं ५० हजार अर्ज सादर झाले आहेत. एका बाजूला रखडलेल्या निकालांचा निपटारा करतानाच विद्यापीठाला आता पुनर्मूल्यांकनाची भारही पेलावा लागणार आहे.

एकही डेडलाईन पाळण्यात यश न आलेल्या मुंबई विद्यापीठाने अत्यंत घाईघाईनं निकाल लावण्यास सुरूवात केली. पण यांतही विद्यापीठानं असंख्य घोळ घालून ठेवले. परीक्षेला उपस्थित असूनही 'गैरहजर' दाखवत अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलं. ते देखील एकाचवेळी तीन ते चार विषयांमध्ये.

विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या झापडबंद कारभाराचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनी आता पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार विद्यापीठाकडे आतापर्यंत ५० हजार अर्ज सादर झाले आहेत.


गेल्या वर्षी फक्त १० हजार अर्ज

गेल्यावर्षी विद्यापीठाकडे पुनर्मूल्यांकनासाठी १० हजार अर्ज सादर झाले होते. यंदा हा आकडा थेट ५० हजारांवर गेला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे उर्वरित निकाल लावण्याचं आव्हान विद्यापीठासमोर आ वासून उभे असताना त्यात ५० हजारांहून अधिक पुनर्मूल्यांकन अर्जांचा निकाल लावण्याचं नवं आव्हान विद्यापीठासमोर उभं ठाकलं आहे.


या विद्यार्थ्यांचे अर्ज

पुनर्मूल्यांकनासाठी सादर झालेल्या अर्जांत 'आयडाॅल' आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. निकालाबरोबरच पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार असल्याने हे वर्ष वाया जाण्याची भीतीही विद्यार्थ्यांना सतावत आहे.हेही वाचा -

निकाल लावणे हे एकच ध्येय - कुलगुरू

कुलगुरूंच्या निलंबनासाठी 'पत्र लिहा' मोहीमडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा