SHARE

मुंबई विद्यापीठाच्या चाललेल्या गोंधळाकडं पाहता राज्य सरकारही सध्या झोपा काढत असल्याचं चित्र दिसत आहे. डेडलाईनच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळत असताना विद्यापीठ उच्च न्यायालयालाही डेडलाईन देत आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी झटकून सुट्टीवर गेलेले कुलगुरू पुन्हा परतण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार कुलगुरूंना पुन्हा रूजू करण्यात येऊ नये, म्हणून कुलगुरूंविरोधात 'पत्र लिहा' मोहीम छेडण्यात आली आहे.

डॉ संजय देशमुख यांच्या सारख्या बेजबाबदार आणि निष्काळजी व्यक्तिमत्वास पुन्हा विद्यापीठच्या प्रशासनात घेऊ नये, यासाठी विद्यार्थी भारतीनं राज्यपालांना 'पत्र लिहा मोहीम' सुरू केल्याचं विद्यार्थी भारतीच्या कार्याध्यक्षा स्मिता साळुंखे यांनी सांगितले.

या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी राज्यपालांना vidyasagarch6@gmail.Com या इमेल आयडी वर पत्र लिहून करून डॉ संजय देशमुख यांना पदावरून हद्दपार करण्याची मागणी करावी.


कुलगुरूंच्या एका निर्णयामुळं हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांचे हे वर्ष वाया गेले आहे. या सर्व गोष्टींसाठी कुलगुरू डॉ. संजय देशमुख हेच एकमेव जबाबदार आहेत. त्यांच्या एका निर्णयामुळं विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की त्यांनी कुलगुरूंच्या निलंबनासाठी राज्यपालांना पत्र लिहावीत.
-विजेता भोनकर, अध्यक्ष, विद्यार्थी भारती
हे देखील वाचा -

निकालांसाठी विद्यापीठाचं पुन्हा नवं गाऱ्हाणं, दिली सहावी डेडलाईन

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मदतीला मुक्त विद्यापीठडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या