Advertisement

कुलगुरूंना विद्यापीठात प्रवेश करू देणार नाही- वायकर


कुलगुरूंना विद्यापीठात प्रवेश करू देणार नाही- वायकर
SHARES

सर्व परीक्षांचे निकाल लावण्यात मुंबई विद्यापीठाला अद्याप यश आलेलं नसतानाच ऑनलाईन पेपर तपासणीचा वादग्रस्त निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी राज्यपालांना पत्र पाठवून पुन्हा कामावर रूजू होण्याची परवानगी मागितल्याची चर्चा आहे. त्यावर काहीही झालं तरी देशमुख यांना पुन्हा विद्यापीठात रूजू होऊ देणार नाही, अशी भूमिका उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली आहे.

राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) घ्यायची की, शासकीय सीईटी घ्यायची, याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र वायकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि महाविद्यालय, विद्यार्थी प्रतिनिधी, यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत देशमुख यांचा परतीचा प्रश्न उपस्थित होताच काहीही झालं तरी त्यांना पुन्हा विद्यापीठात रूजू होऊ देणार नाही, असं मत वायकर यांनी व्यक्त केलं.

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून कुलगुरू अचानक रजेवर गेले. त्यांच्या गलथान कारभारामुळंच विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा कुलगुरूंना इतर महाविद्यालयातही नियुक्त करू नये, असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं.


पुढील वर्षी सीईटीचा विचार

पुढील वर्षी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जेईई सक्ती करावी की शासकीय सीईटी घ्यावी यावर अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. जेईई घ्यायाची असेल तर त्याची घोषणा एक ते दोन वर्ष आधीच करायला हवी. तरच विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायला वेळ मिळेल. जेईईला या आधीही अनेक वेळा विरोध झाला आहे. त्यामुळं सरकार पुढील वर्षी सीईटी घेण्याचा विचार करत असल्याचंही यावेळी वायकर यांनी सांगितलं.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा