Advertisement

निकालांसाठी विद्यापीठाचं पुन्हा नवं गाऱ्हाणं, दिली सहावी डेडलाईन


निकालांसाठी विद्यापीठाचं पुन्हा नवं गाऱ्हाणं, दिली सहावी डेडलाईन
SHARES

मागच्या सुनावणीला मुसळधार पाऊस आणि गणेशोत्सवामुळं ३१ ऑगस्टला निकाल लावणं शक्य झालं नाही, असं कारण देणाऱ्या मुंबई विद्यापीठानं उच्च न्यायालयाला पुन्हा नवं कारण दिलंय. गणेशोत्सव आणि बकरी ईदमुळं ६ सप्टेंबरपर्यंत निकाल लावता आले नाहीत, असं विद्यापीठानं न्यायालयाला सांगितलं आहे.

विद्यापीठाचं हे अजब कारण ऐकून आता हसावं की रडावं, हे सुद्धा विद्यार्थ्यांना सुचेनासं झालं आहे. विद्यापीठ निकाल लावण्यासाठी चक्क न्यायालयालाच 'तारीख पे तारीख' देत असल्यानं सततच्या डेडलाईनला आता विद्यार्थी कंटाळले आहेत. आता १९ सप्टेंबरपर्यंत सर्व निकाल लावू, अशी हमी विद्यापीठानं बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाला दिली आहे.

येत्या १९ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाचे सर्व म्हणजेच ४७७ निकाल जाहीर होतील, असं विद्यापीठानं न्यायालयाला सांगितलं. मात्र न्यायालयाने यावेळी विद्यापीठाला लेखी स्वरूपात हमी देण्याचे आदेश दिले आहेत. निकालाची ५ वी डेडलाईनही उलटून गेल्यानं विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नव्या डेडलाईनमुळं आता विद्यार्थ्यांना १९ सप्टेंबरपर्यंत निकालासाठी वाट बघावी लागणार आहे.



हे देखील वाचा -

'या' वेबसाईटवर तुम्हाला दिसेल निकाल!



 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा