Advertisement

'या' वेबसाईटवर तुम्हाला दिसेल निकाल!


'या' वेबसाईटवर तुम्हाला दिसेल निकाल!
SHARES

'३१ ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लावण्याचा प्रयत्न करू', असे मुंबई उच्च न्यायालयाला सांगणाऱ्या मुंबई विद्यापीठाने अत्यंत घाईघाईने २७ ऑगस्टला कॉमर्सचे निकाल जाहीर केले खरे, पण हे निकाल विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिसत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सलग तीन दिवस उलटूनही हे निकाल दिसत नसल्याने अखेर मुंबई विद्यापीठाने नवीन वेबसाईट सुरू करून त्यावर सर्व निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

तांत्रिक कारणांमुळे कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना निकाल बघता आले नाही. त्यामुळे नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्यावर विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहता येतील, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटूळे यांनी दिली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहायचे असतील, त्यांनी या http://www.mumresults.in/वेबसाईटवर जावे.


६ सप्टेंबरची नवी डेडलाईन

३१ ऑगस्टची डेडलाईन पाळण्यातही अयशस्वी ठरलेल्या मुंबई विद्यापीठाने आता ६ सप्टेंबरपर्यंत सर्व निकाल लावू, असे आश्वासन न्यायालयाला दिले आहे. विशेष म्हणजे मंगळवारी झालेला मुसळधार पाऊस आणि गणेशोत्सवामुळे निकाल लावण्यास विलंब झाल्याचे अजब कारण मुंबई विद्यापीठाने दिले.

मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत कला शाखेचे 153 पैकी 151, विज्ञान शाखेचे 47 पैकी 43, आणि वाणिज्य शाखेचे 50 पैकी 30 निकाल जाहीर केले आहेत. एकूण 477 पैकी 447 निकाल लावले असून अजून 30 निकाल जाहीर करायचे आहेत. हे निकाल 31 ऑगस्टपर्यंत जाहीर करू असे मागील सुनावणीत मुंबई विद्यापीठाने न्यायालयाला आश्वासन दिले होते. परंतु मंगळवारच्या मुसळधार पावसाचा इंटरनेट सेवेवर परिणाम झाला तसेच गेल्या आठवड्यात गणेश चतुर्थीची सुट्टी होती. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापक येऊ शकले नाही, असा युक्तिवाद मुंबई विद्यापीठाचे वकील रूई रॉड्रिग्ज यांनी उच्च न्यायालयात केला.

रखडलेल्या निकालामुळे उच्च न्यायालयाने विधी शाखेच्या 'सीईटी'साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत वाढवून 6 सप्टेंबर केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी देखील 6 सप्टेंबरला होणार आहे.

विद्यापीठाच्या या घोळवर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर प्रीतिक्रिया दिली आहे.






हे देखील वाचा -

नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा