Advertisement

कॉमर्स शाखेचा निकाल जाहीर


कॉमर्स शाखेचा निकाल जाहीर
SHARES

न्यायालयाने दिलेल्या निकालाची डेडलाईन पाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने घाई करायला सुरुवात केली आहे. विद्यापीठाने रविवारी रात्री उशिरा कॉमर्सच्या निकालाची घोषणा केली. यात 66 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अद्याप कॉमर्सच्या 1 लाख 81 हजार 496 विद्यार्थ्यांचे निकाल लागणे बाकी आहेत.


टीवाय बी कॉमच्या पाचव्या, सहाव्या सत्राचे निकाल जाहीर

विद्यापीठाने टी. वाय. बी. कॉमच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल जाहीर केले. पाचव्या सत्राचा निकाल 60.92 टक्के तर, सहाव्या सत्राचा निकाल 65.56 टक्के लागला आहे. आतापर्यंत 432 अभ्यासक्रमाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालात बहुतांश निकाल हे कॉमर्स शाखेचे आहेत. आयडॉल वगळता एकूण 41 हजार 105 उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहेत. आयडॉलच्या 58 हजरांच्यावर उत्तरपत्रिकाने अद्याप हातही लावलेला नाही.


अन्य विद्यापीठाचा घेणार आधार

वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आता मुंबई विद्यापीठ अन्य विद्यापीठांच्या प्राध्यापकांचा आधार घेणार आहे. कॉमर्सच्या उत्तरपत्रिका इतर विद्यापीठात मोठ्या संख्येने मूल्यांकनासाठी पाठवण्यात आल्या आहेत. यात कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक येथील यशवंतराव विद्यापीठाचा समावेश आहे.

गणपती उत्सवापासून उत्तरपत्रिका तपासणीचा वेग मंदावला आहे. रविवारी केवळ 83 प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी हजर होते. त्यांनी 4 हजार 345 उत्तरपत्रिकांची तपासणी केली.

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल 31 ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात येतील, असे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी, अनेक मुख्य निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढा दिला होता. यावेळी 31 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते.


हेही वाचा - 

इस्त्रा शाळेच्या उत्तरपत्रिका आता बोर्ड तपासणार

नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा