Advertisement

इस्त्रा शाळेच्या उत्तरपत्रिका आता बोर्ड तपासणार


इस्त्रा शाळेच्या उत्तरपत्रिका आता बोर्ड तपासणार
SHARES

दहिसर येथील इस्त्रा शाळेतून चोरीला गेलेल्या 416 उत्तरपत्रिकांपैकी पोलिसांनी 316 उत्तरपत्रिका हस्तगत केल्या आहेत. त्या उत्तरपत्रिकांची तपासणी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ करणार असल्याचं मुंबई विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. उर्वरीत 100 उत्तर पत्रिकांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. लवकरच त्या उत्तरपत्रिका सापडतील आणि त्या बोर्डाच्या स्वाधीन करू असं पोलिसांनी सांगितलं.

दहिसर येथील इस्त्रा शाळेत मुख्यध्यापकांच्या कार्यालयातून एसएससी बोर्डाच्या 416 उत्तर पत्रिका चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी चार जाणांना अटक केली होती. अटक केलेल्यांमध्ये 2 जण अल्पवयीन आहेत. हे चौघही गर्दुल्ले आहेत. दारू पिण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे उत्तरपत्रिकांची रद्दी विकून पैसे मिळवण्यासाठी पेपर चोरल्याचं त्यांनी कबूल केलं. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी उद्यानात उत्तरपत्रिकांचा शोध घेतला. तेव्हा 316 उत्तरपत्रिका पोलिसांना सापडल्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा