SHARE

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांच्या एकूण 477 परीक्षांपैकी 469 परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. फक्त 8 निकाल शिल्लक असून उर्वरीत निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेमध्ये दिली. यावेळी विद्यापीठाची संपूर्ण नवीन टीम उपस्थित होती. एकूण 17 लाख 32 हजार 949 उत्तरपत्रिका तापासायच्या होत्या, त्यापैकी 35 हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे.


निकालात RR म्हणजे नापास नाही

निकालात काही विषयांच्या पुढे RR हा शेरा मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोधळ उडाला. याचा अर्थ नापास असा होत नाही. तर त्या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.अशी माहिती परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटूळे यांनी दिली.


परदेशी जाणाऱ्यांचे घाईने निकाल

ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जायचे होते आशा 2 हजार 630 विद्यार्थ्यांचे निकाल युद्धपातळीवर लावण्यात आले आहेत, अशी माहिती कुलगुरूंनी दिली.


गहाळ याचा अर्थ हरवला असा होत नाही

अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात अॅबसेन्ट, नापास असा शेरा आल्यानंतर उत्तरपत्रिका हरवल्या आहेत. अशा अफवा पसरल्या, खरतर उत्तरपत्रिका हरवल्या नसून त्या दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या गठ्ठ्यात चुकून ठेवल्या गेल्या आहेत. त्या शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी 28 हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. 35 हजार 188 उत्तरपत्रिकांचा शोध सुरू आहे, अशी माहिती कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत दिली.


1 महिन्यात करून दाखवले

10 ऑगस्टला विद्यापीठातील निकालांची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळेस 180 निकाल लागणे बाकी होते. मात्र केवळ एका महिन्यात जास्तीतजास्त निकाल लावण्यात यश आले आहे. आता केवळ 8 निकाल लावणे बाकी आहे.


नव्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

  • बीए सत्र पाचवे - 8 नोव्हेंबर
  • बीए सत्र सहावे - 22 नोव्हेंबर
  • बीएससी सत्र पाचवे - 8 नोव्हेंबर
  • बीएससी सत्र सहावे - 27 नोव्हेंबर
  • बीकॉम सत्र पाचवे - 20 नोव्हेंबर
  • बीकॉम सत्र सहावे - 15 डिसेंबर

हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मदतीला मुक्त विद्यापीठ

कुलगुरूंना विद्यापीठात प्रवेश करू देणार नाही- वायकर


संबंधित विषय
ताज्या बातम्या