गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल मंगळवार २८ मे रोजी जाहीर झाला आहे. हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. त्याशिवाय या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
राज्याचा बारावीचा निकाल यंदा ८५.८८ टक्के इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल ८३.८५ टक्के इतका लागला असून २ लाख ६५ हजार ०४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागातून ३ लाख १६ हजार १०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर राज्यात एकूण १४ लाख २१ हजार ९३६ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण ९०.२५ टक्के असून मुलांचं प्रमाण ८२.४० एवढं टक्के आहे.
शाखा | परीक्षेला बसलेले विद्यार्थी | उत्तीर्ण | टक्केवारी |
विज्ञान | ५ लाख ५३ हजार ७३७ विद्यार्थी | ५ लाख १२ हजार ७६३ विद्यार्थी | ९२.६० |
कला | ४ लाख ४८ हजार १७६ विद्यार्थी | ३ लाख ४२ हजार ६५० विद्यार्थी | ७३.४५ |
वाणिज्य | ३ लाख ६६ हजार ०४४ विद्यार्थी | ३ लाख २३ हजार १४० विद्यार्थी | ८८.२८ |
मॅनेजमेंट | ५३ हजार ९७९ विद्यार्थी | ४२ हजार ६०६ विद्यार्थी | ७८.९३ |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी ते मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात आला आहे.
निकाल पाहण्यासाठी 'या' वेबसाईटवर जा
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
and mahahsscboard.maharashtra.gov.in.
दरम्यान वर दिलेल्या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालाच्या लिंकवर क्लिक करा, तुमचा सीट नंबर टाका. त्यानंतर, विद्यार्थ्यांना निकाल स्क्रीनवर दिसणार आहे.
इतक्या विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
यंदाच्या या परीक्षेकरता राज्यातील १४ लाख २१ हजार ९३६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिला असून त्यातील ७ लाख ९१ हजार ६८२ विद्यार्थी तर ६ लाख ३० हजार २५४ विद्यार्थिनी आहेत. या परीक्षेतील विज्ञान शाखेकरता ५ लाख ५३ हजार ७३७ विद्यार्थी, वाणिज्य शाखेकरता ३ लाख ६६ हजार ०४४ विद्यार्थी, कला शाखेकरता ४ लाख ४८ हजार १७६ विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता ५३ हजार ९७९ विद्यार्थी बसले होते.
हेही वाचा -
मुंबईतील सहा मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पुर्ण होणार
मुंबईत १.४१ लाख मोटारसायकल चालकांवर कारवाई