Advertisement

मुंबईतील ६ मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार

मुंबईमध्ये सुरू असेलेल्या ६ मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. राज्यातील रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सोमवारी आढावा घेतला.

मुंबईतील ६ मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार
SHARES

मुंबईमध्ये सुरू असेलेल्या ६ मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. राज्यातील रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सोमवारी आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेट्रो मार्ग -२ बी, ,,४ ए, ५ आणि ६ यामार्गाचे ११९ किलोमीटरचं तसंच अतिरिक्त १६९ किलोमीटर मार्गिकेचं काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असं म्हटलं. त्याचप्रमाणं त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.


व्हिडिओ कॉन्फरन्सींग

मुंबईसह विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचं काम पुढील वर्षी पूर्ण करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्याशिवाय, वर्धा-नागपूर आणि अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो महामार्ग विकसित करण्यासाठी तंत्रनिकेतनाची ५.७६ हेक्टर जमीन तसंच, ग्रामीण भागातील ४ हेक्टर आणि बाळेवाडीतील ४ हेक्टर जमीन विकसित करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्यासाठी पीएमसीला जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे.


पुनर्विकासावर चर्चा

मुंबई मेट्रो मार्ग ३ कुलाबा ते वांद्रे, सिप्झ कॉरिडॉर, नागपूर मेट्रो, मोनोरेल, मेट्रो मार्ग ४ ए, मेट्रो मार्ग ६ समर्थ नगर ते विक्रोळी, मेट्रो मार्ग ७ अंधेरी ते दहिसर, मेट्रो मार्ग २ बी डी. एन नगर ते मंदाले, मेट्रो मार्ग क्रमांक २ ए दहिसर पूर्व ते डी.एन नगर तसंच, भेंडीबाजार पुनर्विकास या विषयांवर देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

या बैठकीदरम्यान मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकासच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.


कामाचं योग्य नियोजन

मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी कामाचं योग्य नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मेट्रो मार्ग क्र. ७ अंधेरी-दहिसर हा मार्ग विकसित करण्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करणं, तसंच मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासरवडवली विकसित करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.



हेही वाचा -

'परे'वरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १३.९७ लाखांचा दंड वसूल



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा