बीएससी-आयटीचा निकाल जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीएससी-आयटी (सेमिस्टर ६) या परीक्षेचा निकाल सोमवारी २५ जूनला जाहीर करण्यात आला. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात बीएससी-आयटी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ६०.६९ टक्के इतका लागला आहे.

किती विद्यार्थी उत्तीर्ण?

या परीक्षेला १० हजार ९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील १० हजार ६८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ५ हजार १८६ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले असून ३३१९ विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहेत. या निकालात २४१ जणांना डिस्टिंक्शन, २ हजार १७० विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास, १ हजार ६५२ विद्यार्थ्यांना सेकंड क्लास तर १ हजार ०६८ विद्यार्थ्यांना पास क्लास मिळाला आहे.

'इथं' बघा निकाल

याशिवाय गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षातील अन्य ५२ परीक्षांचं निकालही सोमवारी जाहीर करण्यात आले असून हे सर्व निकाल विद्यापीठाच्या www.mu.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.


हेही वाचा-

जात वैधता प्रमाणपत्राशिवाय होणार प्रवेश प्रक्रिया

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : इस्माईल युसूफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा


पुढील बातमी
इतर बातम्या