अखेर टीवायबीकाॅमचा निकाल जाहीर

तृतीय वर्ष बी.कॉमच्या पाचव्या सत्रातील ७ ग्रेड पॉइंट आणि सीबीसीएस या परीक्षांचा निकाल मुंबई विद्यापीठाने नुकताच जाहीर केला. ही परीक्षा ऑक्टोबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांना एकूण ३६ हजार ९७० विद्यार्थी बसले होते.

तृतीय वर्ष बी.कॉमच्या पाचव्या सत्रातील सीबीसीएस परीक्षेसाठी ६५ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर ६४ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यातील ३४ हजर ३४०  विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ५५.१२% एवढी आहे. तृतीय वर्ष बी.कॉमच्या पाचव्या सत्रातील सीबीसीएस, ७ ग्रेड पॉइंट या परीक्षेसाठी २९०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर २६३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते यातील एफ ग्रेडमध्ये १८९७, ई ग्रेडमध्ये ३४५, डी ग्रेडमध्ये १९५, सी ग्रेडमध्ये ८५, बी ग्रेडमध्ये ३९, आणि ए ग्रेडमध्ये ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेचा निकाल २६.१९% एवढा लागला आहे. दोन्ही परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकन हवं असल्यास दिलेल्या मुदतीत अर्ज करणं आवश्यक असल्याची माहिती परीक्षा संचालक विनोद पाटील यांनी दिली.


हेही वाचा-

शैक्षणिक कर्ज घेण्याआधी हे जाणून घ्या

'जेएनयू'मधील आंदोलनाचे मुंबईत पडसाद


पुढील बातमी
इतर बातम्या