प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची कटऑफ नव्वदीपार

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता सोमवारी जाहीर झाली. यंदा अनेक नामांकित महाविद्यालयांचा कटऑफ नव्वदीपार गेल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कटऑफ १ ते २ टक्क्यांनी वाढलं आहे. या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १८ जून ते २० जूनदरम्यान महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.  

विद्यार्थ्यांची संख्या मोठी

यंदा सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांसोबत आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या अभ्यासक्रमांसाठी देखील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कॉमर्स शाखेकरीता विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून, पारंपरिक अभ्यासक्रमांकडंही विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. बीबीआय (बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स), बीएएफ (बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्स), बीएफएम (बॅचलर इन फायनान्स मार्केट) यांसारख्या अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांची चांगली पसंती मिळत आहे.

गुणवत्ता यादी

नामांकित महाविद्यालयांच्या पारंपरिक आणि सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांचा कटऑफ नव्वदीपार गेल्यानं ८० ते ९० टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांना साहजिकच आता दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.

पहिली गुणवत्ता यादी

मिठीबाई महाविद्यालय

बीए - ९६ %

बी.कॉम-८९.६९%

बीएमएस

आर्टस् - ९१.१७%

कॉमर्स ९५.६० %

सायन्स - ९१.६७ %

बीएमएम

आर्ट्स- ९४.६७ %

कॉमर्स -९३.४० %

सायन्स -९२.१७%

बीएएफ ( बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स)

आर्टस् - ९५.२० %

रुईया महाविद्यालय

बीए - ९५.%

बी.एससी - ८६.३१ %

बीएमएम

आर्टस्-९३.%

कॉमर्स- ९०.%

सायन्स - ९३.%

विल्सन महाविद्यालय

बीए ८५%

बी.एससी ७०%

बीएमएस

आर्टस्- ८७.%

कॉमर्स- ९२.%

सायन्स- ९०%

बीएमएम

आर्टस् - ९३%

कॉमर्स ९३.%

सायन्स - ९०.%

झेवियर्स महाविद्यालय

बीए - ९२.३१%

बीएससी (आयटी)-९५%

बीएससी ( बायलॉजीकल सायन्स )- ७७.%

बीएमएस - ८०.१३%

बीएमएम - ८१.८८%

एच आर कॉलेज

बी कॉम - ९६%

बीएमएम

आर्टस्- ९४.२०%

कॉमर्स- ९३.२०%

सायन्स - ९२%

बीएमएस

आर्टस्- ९०.४०%

कॉमर्स - ९५.६०%

सायन्स - ९१.४० %

रुपारेल कॉलेज

बी कॉम ८२. ७६ %

आर्टस्७६ . ४६%

कॉमर्स ८४ . ०३ %


हेही वाचा -

फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मंगळवारी विधिमंडळात होणार सादर

महापालिका बेस्टला देणार ६०० कोटी अनुदान


पुढील बातमी
इतर बातम्या