आयडॉलच्या प्रवेशास १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राचे प्रवेश १९ जानेवारीपासून सुरु झाले आहेत. आता जानेवारी सत्राच्या प्रवेशास १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

जानेवारी सत्रात आतापर्यंत २५७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या जानेवारी सत्रात बीए किंवा बीकॉमच्या प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल.

विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्ष २०२० मध्ये मुंबई विद्यापीठास जानेवारी सत्राच्या प्रवेशास मान्यता देण्यात दिली होती. यानुसार २०२० च्या जानेवारी सत्रात प्रथमच ९०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२१ च्या जानेवारी सत्राचे प्रवेश सुरु असून १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, एमए, एमकॉम व एमए शिक्षणशास्त्र या पाच अभ्यासक्रमामध्ये हे प्रवेश घेऊ शकतील.

आयडॉलमध्ये प्रथमच सेमिस्टर पद्धत सुरु होत आहे. जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम बरोबरच पदव्युत्तर प्रथम वर्ष एमए व एमकॉम मध्येही सेमिस्टर पद्धत सुरु करण्यात येत आहे. एमए मध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून मानव्य व सामाजिकशास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व समाजशास्त्र हे विषयात प्रवेश घेता येईल.

तर एमकॉममध्येही अकाउंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हे सर्व प्रवेश ऑनलाईन आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावरून प्रवेश घ्यावा लागेल.


हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा

आधार कार्ड 'या' १५ गोष्टींसाठी सक्तीचं


पुढील बातमी
इतर बातम्या