Advertisement

आधार कार्ड 'या' १५ गोष्टींसाठी सक्तीचं

यापुढे आता ड्रायव्हिंग लायसन्सबरोबरच १५ सुविधांसाठी आधारकार्ड सक्तीचं होणार आहे.

आधार कार्ड 'या' १५ गोष्टींसाठी सक्तीचं
SHARES

लवकरच अनेक सुविधांसाठी आधारकार्ड सक्तीचं होण्याची शक्यता आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (Driving Licence) देखील आधारकार्ड सक्तीचं होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (Ministry of Road Transport and Highways) यासाठी नवीन नियम बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

सध्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स (Online Driving Licence) नूतनीकरण, पत्ता बदलणं, वाहन रजिस्ट्रेशन आणि इंटरनॅशनल लायसन्ससाठी आधारकार्ड सक्तीचं नाही. पण यापुढे आता ड्रायव्हिंग लायसन्सबरोबरच १५ सुविधांसाठी आधारकार्ड सक्तीचं होणार आहे.

परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरून ऑनलाईन सर्व्हिसचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्हाला आधारकार्ड व्हेरिफाय करावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला स्थानिक आरटीओ कार्यालयात जाऊन हे काम करावं लागणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन आधार व्हेरिफाय केलं नाही तर तुम्हाला या वेबसाइटवरून सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

तुम्ही आधारकार्डसाठी अर्ज केला असेल आणि आधार क्रमांक नसेल तर तुम्ही यासाठी आधारकार्डच्या अर्जाच्या स्लीपचा वापर करू शकता. असं या मसुद्यात नमूद करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.



हेही वाचा

समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या प्रकल्पाला मान्यता

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १ मार्चपासून सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा