Advertisement

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १ मार्चपासून सुरू

केंद्र सरकारने चिपी येथील विमानतळावरून विमानोड्डाणास परवानगी दिली आहे. तसेच, चिपी विमानतळावर सोमवारी विमान लॅंडिंगच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या.

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १ मार्चपासून सुरू
SHARES

कोकणवासियांसाठी आता एक खुशखबर आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १ मार्च पासून सुरु होणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ त्वरित सुरु करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार चिपी विमानतळ १ मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते अहमदाबाद अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारने चिपी येथील विमानतळावरून विमानोड्डाणास परवानगी दिली आहे. तसेच, चिपी विमानतळावर सोमवारी विमान लॅंडिंगच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. या दोन्ही चाचाण्या यशस्वी झाल्याने विमानतळ सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

विमान वाहतूकीशी संबंधित दोन कंपन्यांकडून चिपी विमानतळावर लॅंडिंगच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. चिपी विमानतळाचे उद्घटव १ मार्चला पार पडणार आहे. चिपी विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी दररोज दुपारी १:५०  वाजता विमान सुटेल. यासाठी प्राथमिक तिकिटाची किंमत ही सुरूवातीला अडीच हजार रुपये इतकी असणार आहे. तर मुंबईहून चिपीला जाण्यासाठी सकाळी ११ वाजता विमान असेल.  या विमानसेवेमुळे कोकणातील पर्यटनाला आणि आर्थिक क्षेत्राला चालना मिळणार आहे.



हेही वाचा -

मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा