Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा


रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा
SHARES

लोकल सेवा विस्कळीत झाल्यास लोकल पुढच्या स्थानकापर्यंत जाणार की नाही याची अचूक माहिती प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे मोटरमन, गार्डकडून ही माहिती प्रवाशांना मिळावी व लोकल चालवताना होणारे अनेक अडथळे दूर व्हावेत यासाठी ‘मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

लोकल सेवा  हाताळणाऱ्या रेल्वे व्यवस्थापन कक्षाशीही ही यंत्रणा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रकही सुरळीत राहण्यास मदत मिळणार आहे. सध्या के वळ पश्चिम रेल्वेवरच याची चाचणी सुरू आहे. लोकल चालवताना मोबाइलवर बोलण्यास मोटरमनला मनाई आहे.

सध्या मोटरमन व गार्डला धावत्या लोकलमध्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मोटरमन केबिनमध्ये ‘पब्लिक अड्रेस’ (पीए) यंत्रणा आहे. ही यंत्रणा अद्ययावत नसून ती रेल्वेच्या व्यवस्थापन के ंद्राशी जोडलेली नाही. आपतकालीन परिस्थितीत गार्डकडे असलेल्या यादीत रेल्वे स्टेशन मास्तर, रेल्वे नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी असतात. त्याद्वारे गार्ड मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्कही साधतात.

मिळालेल्या माहितीनंतर पीए यंत्रणेद्वारे डब्यातील प्रवाशांनाही लोकलचा गार्ड माहितीही देतो. पावसाळ्यात रुळांवर मोठय़ा प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे लोकलचे वेळापत्रक बिघडते. यात लोकल गाडय़ा जागीच थांबल्यानंतर त्या पुढे जाणार की नाही, याची अचूक माहितीही प्रवाशांना मिळत नाही.

त्यामुळेच मोटरमन, गार्ड व नियंत्रण व व्यवस्थापन कक्षात संवाद साधला जावा आणि अचूक माहिती मिळावी. तसेच प्रवाशांपर्यंत वेळेत माहिती पोहोचवता यावी म्हणून अद्ययावत अशी ‘मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिके शन’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. गार्ड, मोटरमनच्या के बिनमध्ये तसेच व्यवस्थापन कक्षात ही यंत्रणा कार्यरत राहील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

आपत्कालीन परिस्थितीत मोटरमन व गार्ड या यंत्रणेमार्फत थेट नियंत्रण कक्ष, लोकल नियंत्रक विभाग, सेक्शन कं ट्रोलर, रेल्वे पोलिसांशीही संपर्क साधू शकतात. विविध विभागांशीही संपर्क साधून गरज असेल तेव्हा अचूक माहिती प्रवाशांनाही देतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा