'खासगी सुरक्षारक्षक नकोच', मुंबई विद्यापीठाचा निर्णय

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुंबई विद्यापीठातून अखेर खासगी सुरक्षारक्षकांना काढून टाकण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने विद्यापीठात खासगी सुरक्षा रक्षक असण्यावर विद्यार्थ्यांकडून आक्षेप घेण्यात येत होता. त्यानुसार आता खासगी कंपनीद्वारे नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना हटवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.

पोलिसांपेक्षा जास्त मानधन

विद्यापीठातील खासगी सुरक्षा रक्षकांना दिला जणारं मानधन आणि विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांच्या मानधानात मोठी तफावत होती. खासगी सुरक्षा रक्षकांना पोलिसांपेक्षा जास्त मानधन दिलं जात होतं. या विरोधात अनेक वेळा संघटनांनी आवाजही उठवला होता.

पोलिसांची जबाबदारी वाढली

विद्यापीठाच्या आवाढव्य परिसराची व्याप्ती बघता चोख सुरक्षेसाठी विद्यापीठाने खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. त्यामुळे पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांची संख्याही जास्त झाली. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. मात्र मानधनाच्या मुद्द्यावरून खासगी सुरक्षारक्षकांना काढून टाकल्यामुळे पोलिसांवरील सुरक्षेची जबाबदारी वाढली आहे.

निर्णयाचं स्वागत

मुंबई विद्यापीठात खासगी सुरक्षा रक्षकांना कायम जास्त मानधन दिलं जात होतं. मात्र आता इथे तैनात पोलिसांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्हच आहे.

- संजय वैराल, सिनेट सदस्य


हेही वाचा-

उत्तरपत्रिका एकाची, फोटाेकाॅपी दुसऱ्याची, मुंबई विद्यापीठाचा नवा घोळ

'एटीकेटी'वरून मुंबई विद्यापीठात 'खडाजंगी'


पुढील बातमी
इतर बातम्या